पुणे -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात फायनान्स कंपन्यांकडून 1 सप्टेंबरपासून कर्जाचे हप्ते वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी मागील सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा बंद असल्याने स्कूल बसचालकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ही मंडळी स्कूल बस चालवतात, असे अनेक जण आहेत, ज्यांनी फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतले आहे. लॉकडाऊनमध्ये सुरुवातीचे काही महिने कर्जाचे हप्ते या फायनान्स कंपन्यांनी नाही घेतले नव्हते. पण, आता या कंपन्या वसुलीच्या मागे लागल्या आहेत. कर्ज घेतलेल्या लोकांना हप्ते भरा, असा सतत तगादा लावला जात आहे. सावकारकी वसुली करतात तसे हे फायनान्स कंपनीचे लोक वसुली करत आहे का काय? असा सवाल कर्जधारकांना पडला आहे.
हेही वाचा -आम्ही जीवाचं रान करून आरक्षण टिकवलं, पण यांनी ते घालवलं...