पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आता सरकारच्याविरोधात रान उठवण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. संवाद यात्रेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शुक्रवारपासून (२३ ऑगस्ट) त्यांच्या या संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी या यात्रेला सुरुवात केली आहे.
सुप्रिया सुळे यांचा 'संवाद दौरा' सुरू; राज्यातील 6 जिल्ह्यात करणार पहिल्या टप्प्यात संवाद
संवाद दौर्याच्या पहिल्या टप्प्यात २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात खासदार सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत.
पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ जिल्ह्यामध्ये संवाद दौरा करणार आहेत. राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा व एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रती सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांतील सर्व घटकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
संवाद दौर्याच्या पहिल्या टप्प्यात २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात खासदार सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचा दौरा करत आहेत. वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून पक्षाने सरकारविरोधात रान उठवण्याची भूमिका घेतली असून सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा हा त्याचाच भाग आहे.