महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ललित पाटील प्रकरणात ससूनच्या डॉक्टरला अटक, रविंद्र धंगेकरांनी 'त्या' अधिकाऱ्याच्या फोन रेकॉर्डची चौकशीची केली मागणी - प्रवीण देवकाते

Sassoon Drugs Case : ससून रुग्णालयात उपचार घेताना ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्यानं गुन्हे शाखेनं एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक केली आहे. प्रवीण देवकाते असं त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे.

Sassoon Drugs Case
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 1:01 PM IST

आमदार रवींद्र धंगेकर

पुणे Sassoon Drugs Case : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वी ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी प्रविण देवकाते यांना अटक केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

ललित पाटीलच्या 2 मैत्रिणींनाही अटक : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यासह ललित पाटीलच्या 2 मैत्रिणी आणि येरवडा कारागृहाच्या कामगारांसह डॉक्टर संजय मरसाळे यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

प्रविण देवकातेंच्या देखरेखीखाली सुरू होते उपचार :डॉ. प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असून ते ऑर्थो विभागाचे प्रमुख होते. ससून रुग्णालयात डॉ प्रवीण देवकाते यांच्या देखरेखीखाली ललित पाटील याच्यावर उपचार सुरू होते. डॉ प्रवीण देवकाते यांनी बलकवडे आणि भूषण पाटील यांच्या फोनवर बोल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन :ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यासाठी पोलिसांशी वारंवार पत्रव्यवहार केला. मागच्याच आठवड्यात आमदार धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी जलद कारवाई करण्याचा शब्द दिला होता. अखेर डॉ प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे. यात अजूनही डॉ. संजीव ठाकूर यांना देखील अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांना ज्या लोकांनी फोन केले, त्यांचा तपास करण्यात यावा. ज्यांनी डिल केली ते बाहेर आहेत, असा आरोप यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

हेही वाचा :

  1. Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ससूनच्या 'डीन'ला दणका; मॅटनं नेमणूक केली रद्द
  2. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलला मदत करणाऱ्या कारागृह मेडिकल ऑफिसरला अटक
  3. Ravindra Dhangekar PC : ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करावं - आमदार रवींद्र धंगेकर

ABOUT THE AUTHOR

...view details