पुणे : Saral Seva Bharti २०२३ : पुण्यात लाखो विद्यार्थी सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत आहेत. शासनाने आता सरळ सेवा भरती एक कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंबंधीचा 'जीआर'सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण-तरुणींना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
9 कंपन्यांना दिलं जाणार कंत्राट : शासकीय कंत्राटी भर्तीचा जीआर (Saral seva Bharti GR) अखेर निघाला आहे. तब्बल 138 संवर्गातील शासकीय पदं ही कंत्राटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत. अभियंता ते शिपाई असे थेट कंत्राटी पद्धतीनेच पदं भरली जाणार आहेत. तर 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भर्तीचे कंत्राट दिली जाणार आहेत.
शासनाकडून रितसर मिळणार कमिशन : कंत्राट मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये काही सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांचाही समावेश आहे. तर संबंधित कंत्राटी कंपन्यांना शासनाकडून रितसर कमिशन मिळणार आहे. संबंधित खात्याचे मंत्री या कंत्राटी भर्तीवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच या कंत्राटी शासकीय भर्तीला कोणतेही आरक्षण लागू होणार नाही.
138 संवर्गातील पदं कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार : शासकीय नोकरी विसरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. सरळ सेवा भरतीमधून कंत्राटी कामगार बनावे लागणार आहे. पूर्वीसुद्धा शासनाने कंत्राटी पद्धतीचा जीआर काढला होता. परंतु विद्यार्थ्यांच्या दबावामुळे हा जीआर शासनाला रद्द करावा लागला होता. परंतु आता शासनाने या जीआरमधून नऊ कंपन्यांना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. कुशल पदांसह तब्बल 138 संवर्गातील पदं यापुढे कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत.
हेही वाचा -
- Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी पीएचडी धारकांचे अर्ज
- SBI Recruitment 2023 : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, वाचा तपशील
- Zilla Parishad Recruitment : जिल्हा परिषदेत 'इतक्या' पदांची मेगाभरती; वय पार झाले तरीही करत येणार अर्ज