पुणे- संतांच्या विचारांची जपवून संत विचार केंद्रस्थानी ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी पैठण येथे 'संत विद्यापीठ' येत्या वर्षभरात सुरू करण्याचे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांना आळंदीत दिले आहे. ते सदगुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात बोलत होते.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही वाचा -'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
मागील बारा वर्षापासून संत विद्यापीठ उभारण्याचे आश्वासन दिले जात होते. इमारत तयार आहे. मात्र, विद्यापीठ सुरू झाले नाही. मात्र, आज मी येण्याच्या आगोदर कुलगुरुंची बैठक घेऊन संत विद्यापीठ जलदगतीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सामंतांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून संत विद्यापीठासाठी इमारत तयार आहे. पण, प्रत्यक्षात हे विद्यापीठ सुरू झालं नाही. आता हे खातं माझ्याकडे असल्याने कोणतीच अडचण नाही. त्यामुळे याच वर्षभरात हे संत विद्यापीठ सुरू करेन, असे आश्वासन सामंतांनी दिले.