बारामती -चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स आणि ई-मॅगेझिनच्या वतीने देण्यात येणार संसद महारत्न पुरस्कर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना (आज) शनिवारी प्रदान करण्यात आला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल आणि सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.के पटनायक यांच्या प्रमुख उपस्थित दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूट क्लब सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार प्रदान - संसद महारत्न पुरस्कार न्यूज
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. संसद अधिवेशनातील खासदारांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते.
हेही वाचा-'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'
बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेचे आभार
या पुरस्कारासाठी सुळे यांनी प्राईम पॉईंट आणि प्रिसेन्स इ मॅगेझिनसह बारामती लोकसभा मतदार संघातील समस्त जनतेचे आभार मानले आहेत. आपल्या बारामती मतदार संघातील मतदारांनी विश्वास दाखवल्यामुळेच आपल्याला संसदेत काम करता आले. हे दोन्ही पुरस्कार आपण महाराष्ट्रातील जनतेला अर्पण करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आपण सर्वांनी विश्वास टाकत सातत्याने आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे प्रांजळपणाने नमूद करावे वाटते की, आपला विश्वास हीच आपल्यासाठी खरी उर्जा आहे. यामुळेच जनहिताच्या मुद्यांना संसदेत मांडता आले, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा-VIDEO: जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले