महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुवर्य हैबत बाबांचे पायरी पूजन, ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात - दिवेघाट अपघात

आजपासून सुरू झालेल्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक वारकरी देवाच्या आळंदी नगरीत दाखल होतात. हा संजीवन समाधी सोहळा तीन दिवस इंद्रायणीच्या काठावर हरिनामाचा गजरासह विविध कार्यक्रमांनी फुलनार आहे.

७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात

By

Published : Nov 20, 2019, 5:59 PM IST

पुणे- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्याचे जनक म्हणून गुरुवर्य हैबत बाबांनी संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेत अर्पण केले होते. तीच आठवण म्हणून आळंदीमध्ये माऊलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा होत आहे. गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

पवित्र अशा इंद्रायणीच्या काठावर गुरुवर्य हैबत बाबा यांची पायरी आहे. परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ केला जातो. पहाटे होम अभिषेक व दूध आरती करत वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हैबत बाबांच्या पायरीचे पूजन केले गेले. ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला आज सुरुवात करण्यात आली.

आजपासून सुरू झालेल्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक वारकरी देवाच्या आळंदी नगरीत दाखल होतात. हा संजीवन समाधी सोहळा तीन दिवस इंद्रायणीच्या काठावर हरिनामाचा गजरासह विविध कार्यक्रमांनी फुलनार आहे.

७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात

संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरात अनेक दिंड्या देवाच्या आळंदीकडे येत असतात. दिंडी सोहळा प्रमुखांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर पुर्णपणे अवलंबून न राहता आपल्या दिंडीतून काही स्वयंसेवक करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण मंगळवारी दिवेघाटात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघाताचा धक्का वारकऱ्यांसाठी सहन न होणार धक्का आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.

संजीवन समाधी सोहळ्यात दुखत घटना...

दिवेघाटात नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्यावर आळंदीतील इंद्रायणी घाटावर असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे आळंदीमध्ये शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details