पुणे : कोणतीही निवडणूक असेल तर राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी कसबा पोट निवडणुकीवर आपली भविष्यवाणी केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे नाराज होते. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीत शहरातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी काकडे यांची समजूत देखील काढण्यात आली आहे. असे सांगितल जात आहे. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाल्यामुळे संजय काकडे यांची नाराजी दूर झाल्याची चिन्ह आहेत. ते आजपासून प्रचारसभांमध्ये सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे.
पोटनिवडणुकीची रणनीती : काल झालेल्या बैठकीबाबत संजय काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की कालच्या बैठकीत कोणाचीही कान उघडणी करण्यात आलेली नाही. कसबा पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. तिन्ही पक्षांची आघाडी झाल्याने कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती ठरवायची यासाठी काल बैठक घेण्यात आली होती. मी नाराज नसून माझी बिझनेसची काही कामे सुरू होती. त्यामुळे मी व्यस्त होतो. पण काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 26 तारखेपर्यंत तुमचे व्यवसाय बाजूला ठेवा. त्यामुळे येता सव्वीस तारखेपर्यंत मी कसबा पोट निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार आहे. असे यावेळी काकडे म्हणाले.