महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंदनाची तस्करी : मुद्देमालासह एकजण जेरबंद - pune crime news today

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून 25 लाख 82 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंदनाची तस्करी
चंदनाची तस्करी

By

Published : Dec 1, 2020, 3:00 PM IST

पुणे -चंदनाची तस्करी करणाऱ्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी 25 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून 25 लाख 82 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली, की पुणे-नगर रोडवर एक टेम्पो क्र. एम एच 17 बी डी 2698 हा नगरच्या दिशेने जात असून त्यामध्ये चंदनाच्या झाडाची लाकडे अवैधरित्या वाहतूक होत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून शिक्रापूर येथे चाकण चौकात मुद्देमालासह एकाला जेरबंद केले.

हेही वाचा - भिवंडीत 'सैराट'ची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन युवकाची क्रूर हत्या

छुप्या पद्धतीने वाहतूक

चंदनाची छुप्या पद्धतीने वाहतूक होत होती. टेम्पो गाणीच्या हौद्यामध्ये एक छुपा कप्पा तयार केला होता. या कप्पात गोण्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली. या प्रकरणात पोलिसांनी सूरज कैलास उबाळे (वय 24) याला अटक केली आहे. तो मूळचा अहमदनगर (रा. चांदा, ता. नेवासा) येथील रहिवासी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details