पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन 3 आज संपून लॉकडाऊन 4 सुरू झालेले आहे. याचा फटका सलून व्यावसायिकांना बसला आहे. सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी किंवा चौथ्या लाॅकडाऊनमध्ये सलून, पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाभिक समाज नेते, महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे.
आर्थिक मदत जाहीर करा, नाहीतर दुकाने चालू करण्यास परवानगी द्या - सलून, पार्लर असोसिएशन
कोरोनामुळे अनेक व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. या संकटाचा फटका सलून व्यावसायिकांना बसला आहे.
आर्थिक मदत जाहीर करा, नाहीतर दुकाने चालू करण्यास परवानगी द्या - सलून, पार्लर असोसिएशन
दोन महिन्यांपासून सलून बंद असून राज्यात 10 लाखांच्या आसपास सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने मदत करावी. विमा संरक्षण आणि कोरोना संरक्षण किट सरकारने द्यावे, केशकला बोर्ड (अर्थिक विकास महामंडळ) चा अध्यक्ष निवडून अर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नाभिक समाज नेते महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.