आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढीवारी सोहळा यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे एतिहासिक सोहळा समजला जाईल. माऊलींच्या पादुकांचे मंगळवारी प्रस्थान होणार असून सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी दिली
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू; मंगळवारी होणार प्रस्थान - ashadhi wari 2020
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदीतून पालखी मार्गाने एसटीने (शिवनेरी) पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून पालखी, एसटी बस आणि साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आळंदीतून पालखी मार्गाने एसटीने (शिवनेरी) पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून पालखी, एसटी बस आणि साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देवस्थानने कडक उपाययोजना राबविल्या आहेत. पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना निरोगी परत आणण्याची जबाबदारी प्रशासन व देवस्थानने घेतली असून त्यानुसार तयारी सुरू असल्याचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व संतांचे पालखी सोहळे वाखरी येथे एकत्र येत असतात. यंदा सर्व पालखी सोहळे एकत्र येऊन परंपरेनुसार क्रमवारीप्रमाणे पंढरीकडे प्रस्थान करतील. या सर्व पालखी दशमीला परतीचा प्रवास करत असतात. मात्र या वर्षीच्या कोरोना महामारीमुळे परतीचा प्रवास करता येणार नसल्याने माऊलींच्या पालखीला दशमीपर्यत पंढरीतच वास्तव्यास परवानगी मिळावी, अशी मागणी देवस्थानच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र, यावर राज्य सरकारने कुठलाही निर्णय दिलेला नाही.