पुणे- सध्या रखरखत्या उन्हात अंगाची लाही-लाही होत असताना सह्याद्रीच्या डोंगर रांगामधुन वाट काढत ट्रेकर ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील तरुण-तरुणी, वयोवृद्धांनी सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनच्या माध्यमातून लोणावळा ते कुसूर हा ट्रेक पुर्ण केला आहे.
कडाक्याच्या उन्हात 'सह्याद्री ट्रेकर्स'चा लोणावळा ते कुसूर ट्रेक यशस्वी - कुसूर
सह्याद्रीचे खरे रुप अनुभवायचे असेल तर या डोंगरकुशीतुनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तरुण-तरुणी, वयोवृद्धांनी सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनच्या माध्यमातून लोणावळा ते कुसूर हा ट्रेक पुर्ण केला आहे.
सह्याद्रीचे खरे रुप अनुभवायचे असेल तर या डोंगरकुशीतुनच प्रवास करावा लागतो. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून सकाळी सात वाजता लोणावळा येथुन हा ट्रेक सुरु झाला. कातळधार, कुसुर पठार ते कुसुर असा ट्रेक करत असताना सकाळच्या कोवळ्या उन्हात ट्रेकर्सने चांगला आनंद घेतला. मात्र, दुपारच्या उन्हात काहीसा आनंद हरवत चालला. मात्र जिद्द कायम ठेवत झाडा-झुडपातुन डोंगराची चढण करत हा ट्रेक पूर्ण केला.
पावसाळ्यात हिरवागार असणारा आणि थंडावा देणारा हा परिसर उन्हामुळे आग ओकत होता. मात्र, ट्रेकर्सची जिद्द कायम होती. यामध्ये तरुण-तरुणी वयोवृद्ध असे सर्वजन रमतगमत निसर्गाचा आनंद घेत सह्याद्रीच्या कुशीत आपला रस्ता पार करत निघाले. मात्र, उष्णता ४० डिग्रीच्या पुढे असताना अधुनमधुन वारे गायब होत होते. त्यामुळे उन्हाच्या चटक्या बरोबर घामाच्या धारा अंगातुन येत होत्या. दरम्यान, कडाक्याच्या उन्हात सुरू झालेला हा ट्रेक वयोवृद्धांनाही तरुणपण देत एक वेगळा अनुभव देत आहे.