पुणे - अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात प्राध्यान्याने काम केल्याने जनतेने त्यांना पुन्हा स्वीकारले, अशी प्रतिक्रिया दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. हा विजय सत्य आणि विकासाचा असल्याचेही ते म्हणाले.
'हा तर सत्य आणि विकासाचा विजय' हेही वाचा - 'दिल्लीत नव्या राजकारणाला सुरूवात'; केजरीवालांनी नागरिकांचे मानले आभार
दिल्लीतील विकासकामांची स्वत: पाहणी केल्याची आठवणदेखील त्यांनी यावेळी सांगितली. 'दिल्लीमध्ये प्रचारात भाजपने १२ मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, तरीही दिल्लीच्या लोकांनी आप पक्षाला साथ दिली हे खूप अभिनंदनीय आहे,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही'
लोकसभा निवडणुकीत भाजपने भावनिक मुद्द्यांवर हात घातल्याने त्यांना विजय मिळाला. असे असले तरी स्थानिक पातळीवर जनता भावनिक राजकारणाला प्राध्यान्य देत नाही, हे या निकालावरून दिसून येत असल्याचे पवार म्हणाले. आगामी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो, असे भाकितही त्यांनी वर्तवले.