पुणे विद्यापीठातील राड्याविषयी आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया पुणेRohit Pawar In Pune University:मी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन नाही तर विद्यार्थ्यांसाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. लोकशाही आणि संविधानाप्रमाणे भारतात सगळ्यांना आंदोलन करण्याचा समान अधिकार आहे; परंतु विद्यापीठाच्या बाहेरचे राजकीय पक्षाचे लोक विद्यापीठात येऊन मारहाण करत असतील तर सहन केले जाणार नाही. लोकशाही मार्गाने विद्यापीठ प्रशासनावर सरकारचा दबाव असला तरी आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं आंदोलन करू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
'या' कारणाने दोन गटात राडा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत अश्लील भाषेत लिखाण केल्याने काल भाजपाने पुणे विद्यापीठांमध्ये आंदोलन केले. त्यावेळेस दुसरीकडे दुसऱ्या एका विद्यार्थी संघटनेची आंबेडकरी चळवळीच्या सभासदांची नोंदणी सुरू होती. त्यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दोन विद्यार्थिनींना मारहाण केली. एक विद्यार्थ्याच्या डोक्यात सायकल घातली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर हे विद्यार्थी आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तुफान राडा झाला.
तर विद्यापीठ बंद पाडू:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपा आणि सरकार यांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना, नेत्यांना असून त्यांची दादागिरी विद्यापीठात चालू आहे. आम्हाला शिक्षण घेण्यासाठी वातावरण चांगलं ठेवावं अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. जो प्रकार झाला या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत. विद्यापीठात जी सुरक्षा व्यवस्था आहे ते फक्त भांडण झाल्यानंतर चित्रीकरण करतात; परंतु त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करा. तोपर्यंत मी उठणार नसल्याची भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली होती. त्यानंतर विद्यापीठातले अधिकारी खैरे हे रोहित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आहे; परंतु विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठांमध्ये असताना सुरुवातीला रोहित पवार यांना खोटं सांगण्यात आलं की, ते दिल्लीला गेलेले आहेत. थोड्या वेळाने मात्र यामध्ये त्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा होते. विद्यापीठाकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. ही कार्यवाही न झाल्यास सोमवारपासून विद्यापीठ बंद पाडू आणि विद्यार्थी संघटनेला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली आहे.
हेही वाचा:
- कुलगुरूंच्या आश्वासनानंतर पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
- BJP Protest In Pune University : मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आक्षेपार्ह लिखाण; भाजपाकडून तीव्र निषेध
- PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींविरोधात सावित्रीबाई फुले विद्यापीठात लिहिला आक्षेपार्ह मजकूर; गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी