पिंपरी-चिंचवड (पुणे) - भरदिवसा चोरट्याने घरफोडी करत 14 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास देहूरोड परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी रमेश कुमारसिंग कन्हैयासिंग (वय-55, रा. विकास नगर देहूरोड) यांनी देहूरोड पोलिसात फिर्याद दिली आहे.
भरदिवसा घरावर डल्ला चोरट्याने 14 तोळे सोने केले लंपास - robbery dehuroad police station
देहूरोड येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरावर डल्ला मारला. यात त्याने 14 तोळे सोने लंपास केले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देहूरोड विकास नगर परिसरातील साई सोसायटीमध्ये फिर्यादी यांचा फ्लॅट आहे. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोंडा उचकटून कपाटातील 14 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. फिर्यादी रमेश हे गुरुवारी सकाळी नोकरीवर गेले होते. तेव्हा, घरात कोणी नव्हते. दुपारी चारच्या सुमारास ते नोकरीवरून घरी परत आले. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघड झाले.
रमेश यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यामधील 14 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच काही हजारांचे चांदीचे दागिने देखील चोरट्याने पळवले आहेत. दरम्यान, घरफोडी करणारे अज्ञात व्यक्ती किती होते? हे स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री उशिरापर्यंत देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.