पुणे -कात्रज वरून साताराकडे जाणारा नवीन सातारा पुणे महामार्गावरील नवले पूल ( Satara-Pune Highway ) हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना उडवले. त्यात या तिघांचा जागीच ( Road Accident in Pune ) मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
Pune Road Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; 3 जण ठार - नवले पूल पुणे
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला असून हा ट्रक पुण्याहून सातार्याच्या दिशेने निघाला होता. सकाळी भूमकर पेट्रोल पंपजवळ या ट्रकने एका दुचाकीस्वाराला उडवले. त्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना उडवत ( Truck Hit the Motorcycle ) पुढे शंभर मीटर पर्यंत त्यांना फरफटत नेले. या तिघाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या त्यांच्या अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे सिंहगड रोडवर ( Sinhagad Road Pune ) पूर्णपणे ट्राफीक जाम झाले होते. घटनेची दखल घेण्यासाठी सिंहगड पोलीस स्टेशनचे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार हे घटनास्थळी पोहोचले. मृतांची नावे अद्यापही काळली नसून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले अनेक दिवसांपासून नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. परंतु प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामूळे अशा अपघातांना जबाबदार कोण, याचे मात्र उत्तर गुलदस्त्यातच आहे.