महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकृतीचा कळस : महिलेला पाहून रिक्षा चालकाचे अश्लील कृत्य

पहिल्यांदा महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु, संबंधित विकृत रिक्षा चालकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा महिलेला पाहून अश्लील कृत्य केले. घटनेप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

महिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाचे अश्लील कृत्य
महिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाचे अश्लील कृत्य

By

Published : Dec 17, 2019, 11:29 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये 34 वर्षीय महिलेला पाहून विकृत रिक्षा चालकाने अश्लील कृत्य केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पहिल्यांदा महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले. परंतु, संबंधित विकृत रिक्षा चालकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा महिलेला पाहून अश्लील कृत्य केले. घटनेप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा -पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर हा येथे किळसवाणा प्रकार घडला आहे. 34 वर्षीय महिला रात्री 9 च्या सुमारास पतीसह दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पती हे शेजारील दुसऱ्या दुकानात दूध आणण्यासाठी गेले. तेव्हा महिला या पाव खरेदी करून दुकानाच्या बाहेर येत असताना त्यांच्याकडे पाहून अनोळखी विकृत रिक्षा चालकाने अश्लील कृत्य केले. महिलेने पतीला बोलवण्याचा प्रयत्न केला असता, तोपर्यंत विकृत रिक्षा चालक पळून गेला.

हेही वाचा -जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 1 च्या सुमारास असाच किळसवाणा प्रकार घडला. तक्रारदार महिला आणि त्यांच्या मैत्रिणी या कॉफी शॉपवर गप्पा मारत थांबल्या होत्या. तेव्हा विकृत रिक्षा चालक आला त्याने त्या महिलेला यांना अश्लील हावभाव करत इशारे केले आणि त्यांच्याकडे पाहून अश्लील कृत्य करू लागला. संबंधित रिक्षा चालकाचा रिक्षा क्रमांक घेऊन महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे. विकृत रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर (एम.एच-12 क्यू.आर-1471) क्रमांकाची रिक्षा कोणाला दिसल्यास सांगवी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details