पुणे - जिल्ह्यातील मावळ परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भात लागवड करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वदूर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मावळ परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. त्याच बरोबर आतादेखील उर्वरित शेतकरी भाताची लागवड करत आहेत. मात्र, पावसाअभावी त्यांना तीन किलोमीटर पाईपलाईन टाकत पाणी आणण्याची वेळ आली आहे.
मावळ परिसरात पावसाची दडी; भात उत्पादन करणारा शेतकरी चिंतेत
जिल्ह्यातील मावळ परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भात लागवड करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वदूर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मावळ परिसरातील काही शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. त्याच बरोबर आतादेखील उर्वरित शेतकरी भाताची लागवड करत आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेच आहे.
मावळ परिसरातील शेतकरी एकनाथ निकम हे गेल्या पाच दिवसांपासून भाताची सहकुटुंब शेतात लागवड करत आहेत. त्याशिवाय, काही मजूर ही रोजनदारीवर भात लागवडीसाठी आणले आहेत. परंतु, गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे भात लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाने मात्र दडी मारली आहे. त्यामुळे लागवड केलेल्या आणि लागवड करत असलेल्या दोन्ही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकरी निकम यांनी तीन किलोमीटर दुरून पाईपाद्वारे पाणी आपल्या शेतात आणले असून त्यानंतर ते भात लागवड करत आहेत. पाऊस वेळेवर पडला नाही तर भात पिकावर याचा परिणाम होऊ शकतो अस शेतकऱ्याचे कुटुंबीय सांगतात.