महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी, चिंचवड अन् भोसरी मतदारसंघात बंडखोरी! - anna bansode

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र बंडखोर उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात बंडखोरी

By

Published : Oct 4, 2019, 9:35 PM IST

पुणे -विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र बंडखोर उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. बंडखोरी करत राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विलास लांडे- अपक्ष उमेदवार (राष्ट्रवादी पुरस्कृत) यांची प्रतिक्रिया

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अण्णा बनसोडे यांची ऐनवेळी वर्णी लागल्याने सुलक्षणा धर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरला, तर सुलक्षणा धर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, राज्यात सेना आणि भाजप यांची युती आहे, असे असताना बंडखोरी करत कलाटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप विरोधात दंड थोपटले आहेत. तर राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे यांनी अर्ज भरला.

हेही वाचा- एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज

भोसरी मतदारसंघात अद्यापही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास पक्षातील नेते तयार नाहीत. त्यामुळे अजित पवार यांची परवानगी घेऊन माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या दत्ता साने यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. हे सर्व असताना भाजपकडून आमदार महेश लांडगे हे निवडणूक लढवत आहेत. हे सर्व राजकीय गणित पाहता 'एक गाव भोसरी, बारा गाव दुसरी' याचा प्रत्येय येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details