पुणे - सैन्यातून निवृत्त होऊन स्वतःच्या गावी परतलेल्या जवानाचे अवसरी बुद्रुक येथील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक हे छोटेसे गाव आहे. येथील रामकृष्ण नाथा हिंगे हे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सैन्यातून निवृत्त होऊन आपल्या घरी परतले.
महाराष्ट्र दिनी निवृत्त होऊन परतला जवान, गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत
जवान देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असतो. म्हणूनच अवसरी येथील गावकऱ्यांनी निवृत्त जवानाचा सन्मान करण्याचे ठरवले. गावकऱ्यांचे हे आदरतिथ्य पाहून रामकृष्ण हिंगे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
भारतीय सैन्याबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना असते. आपला जीव धोक्यात घालून हे जवान देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असतो. म्हणूनच अवसरी येथील गावकऱ्यांनी निवृत्त जवानाचा सन्मान करण्याचे ठरवले. गावकऱ्यांचे हे आदरतिथ्य पाहून रामकृष्ण हिंगे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
भारतीय सैन्यात काम करणाऱ्या प्रत्येक जवानाचा सन्मान करण्याचा मानस असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या सन्मानामुळे जवान स्वतः सुखावले आहेत. पण, परिसरातील नागरिकही गावकऱ्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.