महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचे दुकानदारांकडून स्वागत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

By

Published : Mar 27, 2020, 5:08 PM IST

retails shop owner welcomes government decision
जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचे दुकानदारांकडून स्वागत

पुणे- दैनंदिन आणि जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने किराणा दुकाने 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत राज्यातील दुकानदारांना निर्देश दिले आहेत. पुण्यातील किराणा दुकानदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचे दुकानदारांकडून स्वागत

नागरिकांची गैरसोय टाळण्याबरोबरच गर्दीचेही प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शासनाने सोशल डिस्टन्सिंगची सूचना दिलेली आहे. या निर्णयामुळे नागरिकांनाही दिलासा मिळेल तसेच जी गर्दी होती ती गर्दी होणार नाही. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे स्वागत आहे, अशी भावना दुकानदार कीर्ती कुमार शाहा यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details