पुणे - शहरात आजपासून पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शहरातील सर्वच धार्मिक स्थळे पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रशासनाचा निर्णय मान्य
दगडूशेठ ट्रस्टच्यावतीने याआधी देखील मंदिर सुरू असताना भाविकांचे थर्मामिटर चेकिंग, मास्क, तसेच सोशल डिस्टनसिंगचा वापर अनिवार्य करण्यात आले होतं. तसेच मंदिर प्रशासनाकडूनदेखील चतुर्थीला मंदिर बंद करण्यात आले होते. आत्ता मिनी लॉकडाऊन दरम्यान सात दिवसांसाठी मंदिर पूर्णतः बंद असणार आहे. कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.