महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : ४० तासानंतरही मिळेना मदत; नातेवाईकांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

नातेवाईकांनी आज सकाळपासूनच तहसील कार्यालयावर मदत कार्यासाठी विनंती केली. या घटनेनंतर ३६ तासांनंतर एनडीआरएफच्या जवानांची मदत कार्य मिळेल, असे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी नातेवाईकांना सांगितले.

By

Published : May 3, 2019, 3:11 PM IST

नातेवाईक तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पुणे - खेड तालुक्यातील ढोरेभांबुरवाडी येथील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात पुलावरील कठड्यावरून पाण्यात पडून एक जण बेपत्ता झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. तब्बल ४० तास उलटूनही या व्यक्तीला वाचविण्यासाठी कुठलेही मदत कार्य उपलब्ध झाले नाही. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत, मात्र प्रशासन हातावर हात घेऊन बघ्याची भूमिका घेत आहे, माणिक दत्तात्रय कोतवाल (वय ४४) असे पाण्यात पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांचा तहसील कार्यालयासमोर आंदोलन

चासकमानच्या डाव्या कालव्यात एक मे ला सायंकाळी कॅनॉलच्या बाजूने जात असताना पुलावरून माणिक कोतवाल हे कालव्यामध्ये पडले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध कार्य करण्यात आले मात्र शोध मोहीम विफल ठरली. मात्र या घटनेबाबत महसूल प्रशासनाला खबर देऊनही महसूल यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारची ठोस पाऊल घेण्यात आले नाही. नातेवाईकांनी आज सकाळपासूनच तहसील कार्यालयावर मदत कार्यासाठी विनंती केली. या घटनेनंतर ३६ तासांनंतर एनडीआरएफच्या जवानांची मदत कार्य मिळेल, असे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी नातेवाईकांना सांगितले त्यानंतर ४० तासानंतर तहसीलदार पोलीस चासकमानच्या डाव्या कालव्यावर शोध मोहिमेसाठी रवाना झाली आहे.

दरम्यान जोपर्यंत आमच्या व्यक्तीचा शोध लागत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details