महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरक्षण मिळूनही मराठा समाजातून नाराजीचा सुर, अशा दिल्या प्रतिक्रिया - decision

राज्य सरकार १२ ते १३ टक्के आरक्षण देऊ शकते असे, असे न्यायालयाने नमुद केल्यानंतर पुण्यातील मराठा मोर्चा दरम्यान निघालेल्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत.

आरक्षण मिळूनही मराठा समाजातून नाराजीचा सुर

By

Published : Jun 27, 2019, 5:23 PM IST

पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आले होते. यावरच आज न्यायालायात सुनावणी झाली असून हे आरक्षण न्यायालयात टिकले आहे.

मराठा आंदोलक

हेही वाचा - मराठा आरक्षण संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - मराठा आरक्षण कार्यकर्ते

राज्य सरकार १२ ते १३ टक्के आरक्षण देऊ शकते असे, असे न्यायालयाने नमुद केल्यानंतर पुण्यातील मराठा मोर्चा दरम्यान निघालेल्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. यातील अनेकांनी नाराजी व्यक्त करत १६ टक्के आरक्षण न देता केवळ १२ टक्के का? असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणाचा सरकारने घेतलेला निर्णय योग्यच - उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details