पुणे : एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारत जागतिक विक्रम करणाऱ्याऋतुराज गायकवाडलवकरच भारत संघात स्थान (cricketer Rituraj Gaikwad) मिळवेल. आणि याच पद्धतीने तो कामगिरी करेल, असा विश्वास त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केला (Reaction of cricketer Rituraj Gaikwad father) आहे. त्याची ही खेळी अविस्मरणीय असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली (Reaction of cricketer Rituraj Gaikwad mother) आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षी वडिलांनी ऋतुराजला बॅट बॉल दिला, आणि बाळाचे पाय पाळण्यात या उक्तीप्रमाणे त्याने क्रिकेटमध्ये कारकीर्द केल्याची भावना त्याचे आई वडील व्यक्त करत (Rituraj Gaikwad mother father) आहेत.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात क्वार्टर फायनलमध्ये फलंदाजी :महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात 29 नोव्हेंबरला क्वार्टर फायनल सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर 50 षटकांत 331 धावांचं लक्ष्य ठेवले होते. महाराष्ट्राकडून ऋतुराजने अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचे हे मागील आठ डावातील सहावे शतक होते. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वं शतक होते. सामन्यात उतरताना, उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. महाराष्ट्राने 50 षटकांत 330/5 धावा केल्या होत्या. गायकवाडच्या खेळीशिवाय अंकित बावणे (३७) आणि अझीम काझी (३७) यांनीही काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. कार्तिक त्यागी (3/66) याने गोलंदाजांची निवड केली होती.