पुणे :हनीट्रॅपमध्ये अडकून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. असेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तहेरांच्या होते संपर्कात, अशा संशयावरून त्यांची रॉकडून चौकशी होत आहे. प्रदीप कुरुलकर यांनी वर्षभरात अनेकदा परदेशात दौरे केले आहे. या काळात ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा देखील संशय आहे. जर त्यांनी भेट घेतली असेल, तर मग कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती दिली का? त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला आहे का? याचा तपास देखील करण्यात येत आहे.
DRDO Director: डीआरडीओ संचालकांची रॉकडून होणार चौैकशी; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय - पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा
पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. 9 मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आता रॉकडूनही त्यांची चौकशी होत असल्याची माहिती मिळत आहे.
हालचाली संशयास्पद आढळल्या :संरक्षण संशोधन संस्थेचेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांचे नाव हे मोठे आहे. ते हॅनी ट्रॅपमध्ये कसे अडकले? नेमके काय झाले होते, मग अडकल्यानंतर त्यांनी कोणती माहिती दिली का? याचा तपासही अधिकारी तसेच सायबर एक्स्पर्ट करत आहे. सांगितले जात आहे की, गुप्तचर यंत्रणेला याची माहिती ही जानेवारीमध्ये लागली होती. जेव्हा प्रदीप कुरुलकर यांच्या हालचाली या संशयास्पद आढळल्या होत्या. तेव्हा त्यांचा लॅपटॉप व मोबाइल जप्त केला आहे. मग डीआरडीओच्या समितीकडे याची चौकशी देखील सोपविली होती. चौकशीत कुरुलकर हे दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाइल एटीएसएच्या ताब्यात घेण्यात आला आहे. आता तपासात अनेक बाबी आढळून येत आहे.
माहिती समोरच्या व्यक्तीला मिळाली असेल : हनी ट्रॅपबाबत सायबर तज्ज्ञ राहुल म्हणाले की, जर डीआरडीओ च्या संचालकांनी जर त्यांच्या ऑफिशीयली लॅपटॉप किंवा मोबाईलवरून समोरच्या व्यक्तीशी बोलले असेल, किंवा चॅट केली असेल. तर त्यांना माहीत देखील नसेल. परंतु संपूर्ण माहिती ही लीक झाली असेल. मोठी भीती अशी आहे की, जर त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप हे जर त्या संस्थेच्या वायफायवर असेल, तर त्याद्वारे जे जे वायफायला कनेक्ट असेल त्या सर्वांची माहिती नकळत समोरच्या व्यक्तीला मिळेल, अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.