पुणे- मेगा भरती आम्हालाच एके दिवशी बाहेर ढकलून देईल, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही. पक्षात माणसं येत होती, आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो, असेही ते म्हणाले आहेत. ते वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
हेही वाचा - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने, ईडीच्या कारवाईचा निषेध
यावेळी दानवे म्हणाले, मेगा भरतीची आम्हाला भीती वाटत होती की, मेगा भरती एके दिवशी आम्हालाच बाहेर ढकलून देईल, असे दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. पण, ते इतके सोपे नाही असेही दानवे म्हणाले. एक काळ असा होता की, 1 कार्यकर्ता तयार करायला 10 वर्षे लागायची. तो 30 वर्ष पक्षाचं काम करायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजपमध्ये जे कार्यकर्ते पक्ष बदलून आले. ते सहज आले नाहीत, ते विचार करून आले आहेत, असे दानवेंनी सांगितले.