पुणे - प्रख्यात उद्योगपती रतन टाटा त्यांचा साधेपणा रविवारी (दि. 3 जाने.) पुणेकरांना पाहायला मिळाला. कोथरूड परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी ते स्वतः पुणे शहरात आले होते. त्यांच्या या अकस्मात पुणे भेटीने सोसायटीतील नागरिकांच्या मनात कायमचे घर केले.
वुडलँड सोसायटीतील मित्राची घेतली भेट
कोथरूड परिसरातील गांधी भवन शेजारी असणाऱ्या वुडलँड सोसायटीमध्ये रविवारी (दि. 3 जाने.) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते आले होते. त्यांच्या या भेटीदरम्यान कुठेही सुरक्षारक्षक नव्हते किंवा श्रीमंतीचा बडेजावपणा नव्हता. सोसायटीत राहणाऱ्या या एका जुन्या सहकाऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी तब्बल पाऊण तास वेळ घालवला. रतन टाटांचे हे सहकारी मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. पाऊण तासाच्या या भेटीत त्यांनी आपल्या सहकाऱ्याची विचारपूस केली.