महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कडक नियमांचे पालन करण्याच्या अटींवर सुरू होणार रांजणगाव औद्योगिक वसाहत - कोरोनाचे संकट

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. या काळात सर्वच क्षेत्रातील उद्यागांना फटका बसला आहे. मात्र, रांजणगाव औद्योगिक वसाहत काही कडक नियमांचे पालन करण्याच्या अटींवर सुरू करण्यात येणार आहे.

Rangangaon  MIDC
रांजणगाव औद्योगिक वसाहत कडक नियमांचे पालन करण्याच्या अटींवर सुरु होणार..

By

Published : Apr 18, 2020, 4:10 PM IST

पुणे -राज्य शासनाने आज लॉकडाऊनसंदर्भात नवीन सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील काही घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील कंपनी व्यवस्थापन व पोलीस अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली.

आज (शनिवार) झालेल्या बैठकीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत कंपनी व्यवस्थापनासोबत कंपनी सुरु करण्याबाबत चर्चा झाली. काही नियम व अटींनुसार सर्व औद्योगिक आणि व्यावसायीक आस्थापनांनी कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तसेच उद्योगांसाठी काही वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. यात कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागेल. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची वाहतूक करण्यास मनाई असेल. अशा महत्वाच्या सुचना या बैठकीवेळी देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी दिली.

राज्य सरकार मोठ्या आर्थिक संकटातुून जात असताना औद्योगिक वसाहतीतून उत्पन मिळेल. यासाठी लॉकडाऊनमधून कडक नियमावली तयार करुन कंपन्या सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, या नियमावलीचे पालन न झाल्यास कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उप-अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details