महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ramdas Athawale : काँग्रेस पक्षाची अवस्था ही घर का ना घाट का अशीच - रामदास आठवले - Bharat Jodo Yatra

काँग्रेस पक्षाची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळं आपल्या पक्षाकडे लक्ष द्याव. समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करू नयेत. त्यामुळे ही भारत जोडो (Bharat Jodo Yatra) नाही तर भारत तोडो यात्रा आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात बोलत होते.

Congress
काँग्रेस पक्षाची अवस्था ही घर का ना घाट का अशीचं -रामदास आठवले

By

Published : Nov 19, 2022, 9:34 PM IST

पिंपरी-चिंचवड:काँग्रेस पक्षाची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळं आपल्या पक्षाकडे लक्ष द्याव. समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करू नयेत. त्यामुळे ही भारत जोडो (Bharat Jodo Yatra) नाही तर भारत तोडो यात्रा आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात बोलत होते.

काँग्रेस पक्षाची अवस्था ही घर का ना घाट का अशीचं -रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. त्याला मजबूत करण्याच काम करावं. काँग्रेसची अवस्था घर का ना घाट का अशी झालेली आहे अस आठवले म्हणाले. पुढं ते म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यावर टीका करून कोणाच्या भावना दुखावू नयेत. वैचारिक मतभेद असू शकतात, अशी टीका करून प्रसिद्धी मिळवण्याच काम राहुल गांधी करत आहेत.

राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या जोडण्याच काम करावं, राहुल गांधींच्या यात्रेत लोक गर्दी करत आहेत पण अशी गर्दी जमत असते. याच मतात परिवर्तन होईल अस अजिबात वाटत नाही. आगामी गुजरात निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल. आम आदमी पार्टी यांच्या वादात भाजपचा फायदा होणार आहे. राहुल गांधींची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. समाजात फूट पाडण्यासाठी ते वक्तव्य करत आहेत. पुढे ते म्हणाले की, मनसे भाजप युतीला माझा विरोध आहे, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका ह्या अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सोबत घेणं भाजपला न परवडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details