पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळही उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज सायंकाळी पुण्यात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यात नव्याने उदयास येणाऱ्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी राजू शेट्टींनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात चर्चा केल्याचा खुलासा शेट्टींनी केला.
राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, हेच आमच लक्ष - राजू शेट्टी
राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ३ पक्ष एकत्रीत आले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, हेच आमच लक्ष असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले. या पक्षांचा लवकरच समान कार्यक्रम तयार होईल. त्यानंतर आघाडीतील इतर छोट्या पक्षासोबत चर्चा होईल, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट राज्यात सांगली आणि कोल्हापूर या भागात महापुरामुळे लाखो शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्या भागातील शेतकरी संकटातून बाहेर पडत नाही, तोवर मागील महिनाभरात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाताला आलेले पीक गेले आहे. यामुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट निर्माण झाल्याचे शेट्टी म्हणाले.