पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. शिवाय भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ते जनतेला करत आहेत. राज हे पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठीसुद्धा प्रचारसभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. त्यांनी १८ एप्रिलला पुण्यात होणाऱया राज यांच्या सभेची मोठी उत्सुकता असल्याचे सांगितले.
पुण्यात १८ एप्रिलला धडाडणार राज ठाकरेंची तोफ - सभा
राज ठाकरे पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठीसुद्धा प्रचारसभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
पुण्यात १८ एप्रिलला धडाडणार राज ठाकरेंची तोफ
तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेच्या उमेदवाराने ९४ हजार मते घेतली होती. आता ती मते आमच्या पारड्यात पडतील, असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतो. मात्र, आज परिस्थिती फार वेगळी आहे. राज यांनी घेतलेल्या भूमिकेचे कार्यकर्ते स्वागत करत असले, तरी त्याला समर्थन किती मिळणार तसेच पुणेकर राज ठाकरेंना किती समर्थन देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मनसेचे कार्यकर्ते पुण्यातील सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.