महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजगुरुनगर शहरातील अंगणवाडी पाण्यात; जिल्हा परिषदेसह नगरपरिषदेचे दुर्लक्ष

गोरगरीब मुलांना बालपणाचं शिक्षण देणारी अंगणवाडीच गरीब बनत चालली असून राजगुरुनगर शहरात असणाऱ्या अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असताना आताच्या पावसात अंगणवाडीच्या खोलीतच पाणी शिरले.

By

Published : Jun 24, 2019, 11:05 PM IST

राजगुरुनगर

पुणे - गोरगरीब मुलांना बालपणाचं शिक्षण देणारी अंगणवाडीच गरीब बनत चालली असून राजगुरुनगर शहरात असणाऱ्या अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असताना आताच्या पावसात अंगणवाडीच्या खोलीतच पाणी शिरल्याने शिक्षणाचे धडे घ्यायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजगुरुनगर
पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शहरी भागातील अंगणवाड्यांकडे आता दुर्लक्ष होत आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अंगणवाडीचे छत गेल्या अनेक दिवसांपासून मोडळीस आले. मात्र, याकडे पंचायत समिती व राजगुरुनगर नगरपरिषद या दोघांनीही दुर्लक्षच केल आहे. उलट या दोन्ही संस्था आपआपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.राजगुरुनगर शहरातील गोरगरीब कुटुंबातील चिमुकली मुले आपले बालपणीचे शिक्षण या अंगणवाडी घेतात. मात्र, आता या चिमुकल्यांच्या शिक्षणावर पाणी पडल्याने आता शिक्षणाचे धडे कुठे गिरवायचे असाही प्रश्न पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details