पुणे - भाजप शिवसेनेची युती हा शिवसेनेने मांडवली करण्याचाच प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच ते युतीसाठी तयार झाल्याचे वक्तव्य विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
ईडीची भीती दाखवल्यानेच शिवसेना भाजपसोबत - राधाकृष्ण विख - उद्धव ठाकरे
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी भाजप निर्लज्ज पक्ष आहे, चौकीदार चोर आहे अशी अनेक वेळा वाईट शब्दात टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यामध्येही भाजप शहीद झालेल्या जवानांच्या टाळूवरचे लोणी खाते आहे, अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी भाजप निर्लज्ज पक्ष आहे, चौकीदार चोर आहे अशी अनेक वेळा वाईट शब्दात टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यामध्येही भाजप शहीद झालेल्या जवानांच्या टाळूवरचे लोणी खाते आहे, अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अयोध्येत राममंदिर झाल्याशिवाय पुढे चर्चा नाही. शेतकऱ्यांना मदत झाल्याशिवाय भाजपसोबत चर्चा नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणत होते. मात्र, तरीही युती होते आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांना काय चिरीमिरी मिळाली ते महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे, अशीही मागणी विखेंनी केली.
विखे यांनी भाजपवरही निशाणा साधला. एकीकडे शिवसेनेने अनेक आरोप करत शेलकी टीका केली. मात्र, 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपने युतीसाठी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, अशी टीका विखे यांनी केली.