महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची - Girish Bapat

गिरीश बापट हे शुक्रवारी सायंकाळी शहरातील कॅम्प परिसरात प्रचार करत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत. मात्र, आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही. मग आम्ही मतदान का करावे? असा प्रश्न त्यांनी बापट यांना विचारला आहे.

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची

By

Published : Apr 20, 2019, 2:06 PM IST

Updated : Apr 20, 2019, 3:22 PM IST

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे आपल्यालाच मतदान करा, असा आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभा मंतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पाण्याच्या समस्येवरून पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

...आम्ही तुम्हाला मतदान का करावे; पुणेकरांच्या प्रश्नाने बापटांची गोची

गिरीश बापट हे शुक्रवारी सायंकाळी शहरातील कॅम्प परिसरात प्रचार करत होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत. मात्र, आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही. मग आम्ही मतदान का करावे? असा प्रश्न त्यांनी बापटांना विचारला आहे.

नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक वैतागले होते. त्यामुळे मते मागणाऱ्या गिरीश बापटांचे यावेळी तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Last Updated : Apr 20, 2019, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details