पुणे - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता काल लोकांनी 'जनता कर्फ्यू' पाळला. मात्र, पुण्याच्या मुठा नदी पात्रामध्ये एक अवलियाने पक्षी उपाशी मरू नयेत म्हणून, त्यांना धान्य आणून टाकले. कधी नव्हे ते पुण्यामध्ये सुनसान असले तरी पक्षांबद्दलची माया एका पुणेकराने दाखवली आहे.
अशी ही भूतदया.. एका पुणेकराने भागवली पक्षांची भूक - janta curfew
पुण्यामध्ये जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र सगळं काही बंद असूनही एका पक्षीप्रेमीने आपली पक्षांबद्दलची निष्ठा दाखवून दिली आहे.
अशी ही भूतदया.. एका पुणेकराने भागवली पक्षांची भूक
हेही वाचा -कोरोना दहशत : देशातील 75 जिल्हे लॉकडाऊन करण्याचे राज्यांना निर्देश
एऱ्हवी नदीपात्रातील पक्षांना नागरिक धान्य टाकायला येतात. मात्र, आज म्हणजे गरजेच्यावेळी पक्षांना खाद्याची गरज होती. पक्षी अन्न आणि पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी पुण्यातील नागरिकाने पक्षांना धान्य आणून टाकले.