पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत मामा-भाच्याच्या जोडीने मद्यपान करून परिसरातील आठ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. गणेश खरात आणि आकाश धुडातमल असे या सख्या मामा भाच्याचे नाव आहे. तर चुलत मामा देखील तोडफोडीच्या घटनेत सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मामा-भाचे दारूच्या नशेत तर्र... 8 वाहनांची केली तोडफोड - सांगवी
मामा आणि भाच्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत रात्री दारूच्या नशेत आठ वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी भाच्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर, आरोपी मामाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी भाचा गणेश खरात हा मूळ औरंगाबादचा असून तो नुकताच आकाश धुडातमल (रा.सांगवी) मामाकडे आला होता. तसेच चुलत मामा योगेश देखील शेजारीच राहतो. रात्री उशिरा तिघांनी मद्यपान करून सांगवी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन टेम्पो आणि सहा कारना लक्ष करत दगड आणि सिमेंट च्या ब्लॉक ने चारचाकी गाड्यांचा काचा फोडल्या. यात सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सांगवी पोलिसांनी काही तासातच एका आरोपीला जेरबंद केलं आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील हे करत असून आरोपी मामाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.