दौंड (पुणे) -पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पवनानगर (ता. मावळ) येथून चोरीस गेलेल्या बोलेरो जीपचा पाठलाग करून जीपसह आरोपीस दौंड तालुक्यातील पाटस येथे जेरबंद केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२० ला पवनानगर (ता. मावळ) येथून दुपारी ०१.३० वा.चे सुमारास महिंद्रा बोलेरो जीप (एमएच १४ सीसी ७९४७) ही चोरीस गेली होती. बोलेरो जीप मालक मंगेश रामचंद्र कालेकर यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतल्यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आले. जीप मालक मंगेश कालेकर यांना त्यांचा कामगार चालक विजय सोनकांबळे हा सुद्धा गायब असल्याने त्यानेच जीप चोरी करून पोबारा केल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी तात्काळ चोरी झालेल्या जीपचा नंबर व वर्णनासह माहिती नियंत्रण कक्षा मार्फत वायरलेस व पोलीस व्हॉटसअप ग्रुपवर देवून तिचा शोध घेणेबाबत अंमलदार यांना सुचना दिलेल्या होत्या. या जीप चोरीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले नंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बोलेरो जीप चोरी बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर सर्व अमलदारांना देवून जीपची माहिती घेणेबाबत सुचना दिल्या.
व्हॉट्सअप ग्रुपची मदत
त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना बोलेरो जीप ही पुणे बाजूकडे गेलेली असून ती पुणे-सोलापूर रोडने आरोपी त्याच्या गावी नांदेड येथे घेवून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील व विशेषतः सोलापूर रोडला पेट्रोलिंग करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास व्हॉटसअप ग्रुपवर माहिती देवून शोध घेणेबाबत व जीप मिळून आल्यास ताब्यात घेणेबाबत कळविले होते.