पुणे -शहर व जिल्ह्यात शनिवारपासून मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाचा विळखा वाढत चालल्याने हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी पुणे शहरात आणि जिल्ह्यात एका दिवसात नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला.
पुणे शहरात रविवारी (ता. 4) दिवसभरात तब्बल नवीन 6 हजार 225 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3 हजार 762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज 52 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 901 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज घडीला पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 हजार 950 इतकी आहे. रविवारी 17 हजार 774 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच
जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 12 हजार 494 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या 19 हजार 659 आहे. तर 58 हजार 435 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, एका दिवसात 'एवढ्या' हजार नव्या रुग्णांची भर
पुणे शहरात रविवारी (ता. 4) दिवसभरात तब्बल नवीन 6 हजार 225 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, एका दिवसात 'एवढ्या' हजार नव्या रुग्णांची भर