पुणे : याबाबतची माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार रामयग्य उपाध्याय (वय ४७, रा. सुरत, गुजरात) असे त्याचे नाव आहे. त्याने पिस्तूल कोणत्या कारणासाठी बाळगले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विदेशी बनावटीची एक पिस्तुल जप्त :याबाबतची माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्याच्या कोटाच्या खिशात मेड इन इंग्लंडचे विदेशी बनावटीचे एक पिस्तुल व ६ काडतुसे आढळून आली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी, त्यात सूर्याचे आकाराचे व सूर्याचे चित्र असलेले पेंडण सापडले. ब्रेसलेट, लॅपटॉप असा ३ लाख ५५ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. कपड्याचे व्यापारी असल्याचा त्याने दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तुल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे. तो नागपूरला जात होता.