महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाबत पुणे पोलिसांकडून जनजागृती - कोरोना जनजागृती

अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे नागरिक भयभीत होऊ नयेत, यासाठी आता पोलीसही सरसावले आहेत. पुण्यातील दत्तवाडी येथे पोलिसांनी जनजागृतीला सुरुवात केली आहे.

Dattawadi police
दत्तवाडी पोलीस

By

Published : Mar 21, 2020, 9:57 AM IST

पुणे - देशभरात कोरोनाची भीती लोकांमध्ये वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी राज्यशासनाकडून जनजागृती केली जात आहे. अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे नागरिक भयभीत होऊ नयेत, यासाठी आता पोलीसही सरसावले आहेत. पुण्यातील दत्तवाडी येथे पोलिसांनी जनजागृतीला सुरुवात केली आहे.

कोरोनाबाबत पुणे पोलिसांकडून जनजागृती

हेही वाचा -कोरोनाची धास्ती : गावी जाण्यासाठी परप्रातियांची पुणे रेल्वे स्थानकात तोबा गर्दी

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आपल्या पोलीस व्हॅनवर 'काय करावे आणि काय करू नये' याचे पोस्टर लावले आहेत. नागरिकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने माहिती जाऊ नये यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची ऑडिओ क्लिप तयार केली आहे. ती नागरिकांना वारंवार ऐकवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल आणि भीती कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक देविदास घेवरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details