पुणे- विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनात ७ ते ८ पोलीस जखमी झाल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
पुणे कर्णबधीर लाठीहल्ला; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफआयआर - pune police
लाठीचार्ज कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आपल्या विविध मागण्यांसाठी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाज कल्याण विभाग कार्यालय ते विधिमंडळ असा मोर्चा काढला होता. या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. लाठीचार्ज का करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नसून आंदोलन करणाऱ्या २ हजार ते अडीच हजार विद्यार्थ्यांवरच पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान ७ ते ८ पोलीस जखमी झाल्याचाही आरोपही पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, लाठीचार्ज कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.