पुणे : लावणी स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये आज संध्याकाळी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम संजय दिवार यांनी आयोजित केला होता. ते सामाजिक, राजकीय कार्यकर्ते असून त्यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येणार होते. त्यानंतर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, जागेची NOC आणि ट्रॅफिक NOC नसल्याने पोलिसांकडून परवानगी नाकारली आहे. आज संध्याकाळी शिवणे येथे गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी त्यांना आमंत्रण कार्यक्रमाची तयारी सुद्धा केली होती.
कार्यक्रमाला परवानगी नाकारली :शिवणे येथील संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. मात्र, कायदेशीर बाबी पूर्ण न केल्याने पोलिसांनी ऐनवेळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. गौतमी पाटील यांची तरुणाईत क्रेझ पाहता कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी होण्याची ही शक्यता होती. त्यामुळे लावणीचा कार्यक्रम पुणे शहरातील शिवणे येथे आयोजित करण्यात आला होता.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न : यापूर्वी गौतमी पाटील यांचे महाराष्ट्रात ज्याच्या ठिकाणी कार्यक्रम झाले. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. त्यांच्या कार्यक्रमात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच काही ठीकाणी गोंधळ देखील झाला होता. या गोष्टी लक्षात घेता शिवने भागांमधील उत्तम नगर पोलीस स्टेशनकडे त्यांनी कायदेशीर त्यांना परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी शिवने पोलिसांकडून Noc न घेतल्याने ऐनवेळी पोलिसांनी हा कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारली आहे.
गौतमीने पाटील करणार वेब सीरिजमध्ये :गौतमीने पाटील यांनी काही दिवसापूर्वी वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याची घोषणा तिच्या शोसल मिडियावर केली होती. गौतमी सोशल मीडिया स्टार आहे. त्यांच्या नृत्याने अनेक तरुणांना घायळ केले आहे. त्याचे विविध व्हिडीओ शोसल मिडियावर पाहायला मिळतात. मात्र, नृत्य करताना त्यांच्या हावभावांमुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते.
हेही वाचा -Mohanlal Bhangra with Akshay : सुपरस्टार मोहनलालचा अक्षय कुमारसोबत भांगडा, पाहणाऱ्यांच्या डोळ्याची पारणे फिटली