महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Police Action : बनावट कर्ज देणारे कॉल सेंटर पुणे पोलिसांकडुन उद्धवस्त; सायबर पथकाची कारवाई - सायबर पथकाची कारवाई

पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर पथकाला (Pune Police action) ठाणे येथे जाऊन बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स नावाने चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त करण्यात यश आले. नागरिकांनी कॉल करुन आर्थिक फसवणुक करण्याचे काम या कॉल सेंटर येथे चालु होते. दोन आरोपींनी अटक करून त्यांच्याकडून पुराव्याच्या कामी काही कागदपत्रे जप्त करण्यात आले (busted Fake loan giving call center in Mulund) आहे. तसेच उर्वरित सर्व मुला-मुलींना पुढील तपाससाठी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे हजर राहण्याबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.

Pune Police action
पुणे पोलिसांची कारवाई

By

Published : Dec 16, 2022, 3:01 PM IST

प्रतिक्रिया देताना सुनील पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त

पुणे :पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विविध स्तरातून जनजागृती करूनही सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाला मुलुंड वेस्ट ठाणे येथे जाऊन बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स नावाने चालणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त करण्यात यश आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली (Police action busted Fake loan giving call center) आहे.


तपाससाठी अटक :या प्रकरणी दानेश रविंद्र ब्रिद (वय २५ वर्षे, रा. सर्वोदयनगर, हरिश्री रेसीडेन्सी, फेज-१, अंबरनाथ वेस्ट ठाणे) रोहित संतोष पांडे (वय २४, रा. रुम नं. ११. - संगमसदन, किसन नगर नं. १ बागळे इस्टेट, ठाणे) यांना गुन्ह्याच्या तपाससाठी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० मोबाईल हॅन्डसेट, ०७ टीबी क्षमतेच्या कॉम्प्युटर हार्डडिस्क, ०१ एनव्हीआर, पुराव्याच्या कामी काही कागदपत्रे जप्त करण्यात आले (Pune Police action) आहे.


आर्थिक फसवणुक :नमस्ते, बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधुन सेल्स एक्झिकेटीव्ह बोलत आहे, असे नागरिकांनी कॉल करुन आर्थिक फसवणुक करण्याचे काम या कॉल सेंटर येथे चालु (Fake loan giving call center) होते. त्यामध्ये आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉलद्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगुन नागरिकांचा विश्वास संपादन करून बजाज फिंसव्हची पन्नास लाख रुपयांची पॉलीसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजुर करुन देतो, असे सांगुन नागरीकांकडून त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो यो गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेवुन लोनचे सहा महिन्यांचे प्रिमीयम २,५०,०००/- रुपये होत असल्याचे सांगत असत. त्यापैकी १,२५,०००/- रुपये लोन प्रिमियम म्हणुन भरण्यास भाग पाडुन नागरिकांची आर्थिक फसवणुक करीत असत. या प्रकरणी अज्ञात आरोपीतांच्या विरुध्द दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २८५/२०२२ भा.द.वि कलम ४१९, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला (busted Fake loan giving call center in Mulund) होता.



कायदेशीर पध्दतीने छापा : गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर पथकाने नमुद गुन्ह्याची व करणाऱ्या गुन्हेगारांचा तांत्रिकरित्या माग काढून माहिती घेवुन आरोपी वापरत असलेले मोबाईल क्रमांक, कंपनीचे डोमेन नेम, फसवणुकीची रक्कम ज्या खात्यावर स्वीकारली/ ते बँक खाते, तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे तांत्रीक विश्लेषण केले. त्यामध्ये फसवणुक केल्या प्रकरणी एक कॉल सेंटर मुलुंड वेस्ट, ठाणे या ठिकाणी कार्यान्वित असल्याचे निष्पन्न झाले. प्राप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने नमुद ठिकाणी कायदेशीर पध्दतीने छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी एकुण ४३ मुले मुली नमुद ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसुन फोन कॉल करताना दिसुन आले.


कायदेशीर नोटीस : या गोष्टींची बारकाईन शहानिशा व तपास करून वरील नमुद गुन्ह्याची पध्दत कशा पध्दतीने राबविली जाते, याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तेथील संशयित असणाऱ्या सर्व गोष्टी कायदेशीर पध्दतीने जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये फोन कॉल करण्यासाठी वापरत असले एकुण ४० मोबाईल हॅन्डसेट, ०७ टीबी क्षमतेच्या कॉम्प्युटर हार्डडिस्क, ०१ एनव्हीआर, पुराव्याच्या कामी काही कागदपत्रे इत्यादी जप्त करण्यात आले असुन आरोपी नामे १ दानेश रविंद्र ब्रिद (वय २५ वर्षे, रा. सर्वोदयनगर, हरिश्री रेसीडेन्सी, फेज-१, अंबरनाथ वेस्ट ठाणे) २. रोहित संतोष पांडे (वय २४, रा. रुम नं. ११. - संगमसदन, किसन नगर नं. १ बागळे इस्टेट, ठाणे) यांना गुन्ह्याच्या तपासाकामी अटक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सर्व मुला-मुलींना पुढील तपासासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे हजर राहण्याबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आल्या (Fake loan giving call center in Mulund Mumbai) आहेत.



नागरीकांना आवाहन : अशा प्रकारे नागरिकांना बनावट इन्श्युरन्स कंपनीतून फोन कॉल येत असुन अशा कॉलला प्रतिसाद देवु नये. तसेच असा काही प्रकार घडल्यास भयभीत न होता निसंकोच जवळच्या पोलीस ठाण्यातील सायबर गुन्हे तपास पथकाकडे तक्रार करावी. तसेच यापुर्वी ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी नागरीकांना आवाहन केले (busted Fake loan giving call center in Mulund) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details