पुणे -गणेशाची मागील दहा दिवसांपासुन मनोभावे पुजा करुन बाप्पाला निरोप देत असताना, क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु यांची जन्मभुमी असलेल्या राजगुरुनगर शहरातील सामाजिक संस्था, नगरपरिषद आणि पोलीस यांनी एकत्र येऊन भीमा नदी काठावर गणेशमुर्ती दान करण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम राबवला आहे.
हेही वाचा... प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे संकलन; धुळ्यातील शिवदुर्ग प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथुन उगम पावणारी भीमा नदी सध्या स्वच्छ पाण्याने वाहत आहे. त्यामुळे या गणेशोत्सव काळात भीमा नदिचे पावित्र्य जपण्यासाठी आणि नदी स्वच्छ राखण्यासाठी, करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.