महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2020, 5:17 PM IST

ETV Bharat / state

नियमांचे पालन करून पुण्याच्या गुरुवार पेठेतील मक्का मशीद सुरू

राज्य सरकारने आजपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. पुण्यातील सर्वात जुनी मक्का मशिदही आजपासून नमाजसाठी खुली करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन मशिदीमध्ये प्रवेश दिला जात आहे.

pune makkah masjid reopen today for prayer
नियमांचे पालन करून पुण्याच्या गुरुवार पेठेतील मक्का मशीद सुरू

पुणे - राज्य सरकारने आजपासून सर्व धर्मिकस्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुण्यातील गुरुवार पेठेतील मक्का मशीद आजपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशीद ट्रस्टकडून नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासोबतच थर्मामिटर चेकिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नमाज पठणसाठी येणाऱ्या नागरिकांना विनामास्क तसेच 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मशिदीमध्ये प्रवेश दिला जात नाही. नागरिकही नियमांचे पालन करत मशिदीत प्रवेश करत आहेत.

मक्का मशीद मधील नागरिकांशी बातचित...
मास्क असेल तरच मशिदीत प्रवेश
पुण्यातील गुरुवार पेठेतील मक्का मशीद ही खूप जुनी मशीद आहे. पुण्यातील पेठांमध्ये सर्वात मोठी मशीद अशी, या मशिदीची ओळख आहे. कोरोनानंतर राज्य सरकारने पुन्हा मशिद सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शासनाच्या नियमानुसारच नागरिकांना मशिदीत प्रवेश दिले जात आहे. विनामास्क कोणालाही मशिदीत प्रवेश दिले जात नाही. सोशल डिस्टन्सिंग तसेच मशिदीत नमाज पठणसाठी तयार केलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.
नमाज पठणसाठी मशिदीत विशिष्ठ व्यवस्था
नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरवातीला थर्मामिटरने शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. त्यानंतर सॅनिटायझर आणि मगच नमाज पठणसाठी आत सोडण्यात येणार आहे. मशिदीत नमाज पठणसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी ठराविक अंतर ठेऊन जागोजागी खुणा करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणावरच नागरिकांना नमाज पठण करावे लागणार आहे.
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
गेले आठ महिने कोरोनामुळे सर्वधर्मीय धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होत गेला तसा राज्यात अनलॉक सुरू करण्यात आले आणि हळूहळू सर्व काही सुरू करण्यात आले. आजपासून सर्वधर्मीय धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. आघाडी सरकारने सर्व धर्मीय धार्मिक स्थळे सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि शासनाच्या नियमानुसारच मशिदीत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मक्का मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.



ABOUT THE AUTHOR

...view details