पुणे- कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुण्यातील मेट्रोचे कामकाजही मागील महिनाभरापासून बंद आहे. परंतु, आता पावसाळा तोंडावर आला असताना पावसाशी संबंधित असलेली काही कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून महामेट्रोचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुणे मेट्रोच्या कामाला पुन्हा सुरुवात - महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुणे मेट्रोच्या कामाला पुन्हा सुरुवात
काम सुरू करण्यासाठी महामेट्रोने पुणे महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर महामेट्रोच्या अधिकृतरित्या कामाला सुरुवात झाली. याशिवाय इतर आवश्यक असलेल्या ठिकाणी परवानगी देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली असून परवानगी मिळताच हे काम सुरू करण्यात येईल, असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.
काही ठराविक ठिकाणी हे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील येरवडा आणि बंडगार्डन परिसरात नदीपात्रात ही कामे सुरू झाली आहेत. काम सुरू करण्यासाठी महामेट्रोने पुणे महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर महामेट्रोच्या अधिकृतरित्या कामाला सुरुवात झाली. याशिवाय इतर आवश्यक असलेल्या ठिकाणी परवानगी देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली असून परवानगी मिळताच हे काम सुरू करण्यात येईल, असे महामेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.
काम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, साबण या वस्तू कामगारांना महामेट्रोकडून पुरवण्यात आल्या आहेत. काम करताना सुरक्षित अंतर राखले जात आहे. शिवाय कामगारांची आरोग्य तपासणीही केली जात असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.