महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लढाई : पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराकडून ११ लाख रुपये

श्री. बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री. महालक्ष्मी मंदिर सारसबागच्यावतीने हा ११ लाख रुपयांचा निधी नुकताच देण्यात आला असल्याची माहिती, ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.

cm relief fund
कोरोनाविरुद्ध लढण्याकरीता पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराकडून ११ लाख रुपये

By

Published : Apr 4, 2020, 4:50 PM IST

Updated : Apr 4, 2020, 8:58 PM IST

पुणे -कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीकरिता अनेक कंपन्या, उद्योजक आणि देवस्थाने आर्थिक मदतीचा हात देत आहेत. पुण्यातील श्री. महालक्ष्मी मंदिरातर्फेदेखील कोरोनाविरुद्ध लढाईकरिता ११ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.

कोरोना लढाई : पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराकडून ११ लाख रुपये
श्री. बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री. महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने हा ११ लाख रुपयांचा निधी नुकताच देण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांची काळजी घेत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी मदत केंद्रदेखील सुरू करण्यात आली आहेत. मात्र, खारीचा वाटा म्हणून या कार्यात आम्हीदेखील ११ लाख रुपयांची मदत देत असल्याचे ते म्हणत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपून पुन्हा जनजीवन सुरळीत व्हावे, अशी प्रार्थना प्रत्येकाने देवीचरणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Last Updated : Apr 4, 2020, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details