पुणे -शहर आणि पिंपरी चिंचवडमधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. तिसऱ्या लॉकडाऊन संदर्भात वेगवेगळे निर्णय महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांकडून काढली जात आहेत. त्यामध्ये गोंधळ होत असल्याने व्यापारी महासंघाने आपल्या सदस्यांना पुढील आदेश येईपर्यंत दुकाने पूर्ण बंद ठेवण्यास सांगितले आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.
दुकाने संपूर्ण बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय
पुणे शहरात तिसऱ्या लॉकडाऊन दरम्यान शिथिल करण्यात आलेल्या नियमाबाबत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणाकडून वेगवेगळे निर्णय घेत असल्याने गोंधळ उडत असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे. सामान्य दुकानदाराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पुणे शहरात तिसऱ्या लॉकडाऊन दरम्यान शिथिल करण्यात आलेल्या नियमाबाबत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणाकडून वेगवेगळे निर्णय घेत असल्याने गोंधळ उडत असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे. सामान्य दुकानदाराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुण्यामध्ये 4 मे ला अचानक मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आल्याने सुरक्षिततेचा मुद्दादेखील आहे. दुकानदार त्यांचे कुटुंब तसेच त्याठिकाणी काम करणारे यांच्या सुरक्षेबाबत महासंघाला चिंता वाटत असल्याने पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद ठेवावीत, असे महासंघाने जाहीर केले आहे.