पुणे- कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. सर्व जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्या आहेत. त्यामुळे आता आत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. पुण्यातील बाजार समितीही 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे.
COVID19: पुणे बाजार समितीही आजपासून बंद... - कोरोना व्हायरस पुणे बातमी
पुण्यातील बाजार समितीही 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार आणि आज मंगळवारी अचानक आवक वाढली. आज दोन हजार 50 वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली. तर काल 867 वाहनांधून भाजीपाला आला होता. भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी आणि विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी इथे मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा-CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री
सोमवार आणि आज मंगळवारी अचानक आवक वाढली. आज दोन हजार 50 वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली. तर काल 867 वाहनांधून भाजीपाला आला होता. भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी आणि विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी इथे मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला खरेदी- विक्रीचा व्यवहार शांततेत सुरू होता. मात्र, काही वेळात लोकांची गर्दी हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांनी येऊन येथील गर्दी कमी केली. मात्र, सध्या बाजार समितीसमोर पोलिसांचा बंदोबस्त आहे.